देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले…’सरकारला अजून नऊ दिवस…’

0
256

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बदल्यांबाबतचा अहवाल लीक झाल्याप्रकरणात आज पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांची दोन तास चौकशी केली. या चौकशीचा भाजपाकडून तीव्र निषेध करण्यात येत असून राज्यभर फडणवीसांना आलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. या चौकशीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर  निशाणा साधलाय.

देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असं विचारलं जात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : चौकशीनंतर देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…

तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्या आणि अधिकार असतो. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष माजतो, नियंत्रणाच्या बाहेर जातो. अशावेळी विरोधी पक्षाने त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. तो ठेवताना गोळा केलेली माहिती कुठून मिळाली हे सांगणे आवश्यक नसते. या गोंधळामध्ये देवेंद्र फडणवीसांना घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस पोहोचलेले खेळाडू आहेत,असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्ही प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. देवेंद्र फडणवीस कोर्टाच्या विरोधात गेले नाहीत. गेल्या आठवड्यात त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला ते हिमालयाचे टोक आहे. सरकारला अजून नऊ दिवस अधिवेशन चालवायचे आहे. जरा जपून रहा, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे; काँग्रेस नेत्याची टीका

दुसरा व्हिडिओ बाॅम्ब उद्या-परवा येतोय; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here