आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. आता अशातच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एक वादग्रस्त विधान केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लाड यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
हे ही वाचा : “मनसेनं विजयी खातं उघडलं; जत ग्रामपंचायतीत मनसेच्या प्रियांका खिलारे यांची बिनविरोध निवड”
संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात कोकणात झाली, असं विधान लाड केलं असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
“राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; उद्यापासून राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार”
जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे; राष्ट्रवादीचा पलटवार
… तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य