आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर ऐतिहासिक निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
आमच्या बाजूने 40 आमदार आहेत, असं अजित पवार म्हणाले. यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. पक्ष संघटनेच्या आधारावर नाही तर फक्त आमदारांची संख्या बघून निवडणूक आयोगाने निकाल दिला का? असा प्रश्न पत्रकारानी विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्याकडे पक्षाच्या सर्वाधिक जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा आहे, असं अजित पवार म्हणाले.
ही बातमी पण वाचा : भाजपवाले हरामखोर आहेत; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत इतकंच नाही. आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्वाधिक जिल्हाध्यक्ष आहेत. बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आहेत कारण आमची भूमिका बरोबर होती. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असतं. पक्ष संघटनेतील बहुसंख्य सदस्य आमच्याबरोबर आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान,आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, पक्षाचा झेंडा या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांनी जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे. मी या निकालाचं स्वागत करतो. मान्य करतो. आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो. हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार देणार काँग्रेसला मोठा धक्का?; काँग्रेसचे 15 आमदार फोडणार?
भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या गोळीबारा प्रकरणी मोठी माहीत समोर!
छगन भुजबळ यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, म्हणाले…