Home नाशिक थापानंतर, आता उद्धव ठाकरेंचा अत्यंत विश्वासू ‘हा’ मोठा नेता शिंदे गटात येणार?;...

थापानंतर, आता उद्धव ठाकरेंचा अत्यंत विश्वासू ‘हा’ मोठा नेता शिंदे गटात येणार?; गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. अशातच शिंदे गटानं शिवसेनेला मोठा धक्का दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला., अशातच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी एक मोठं विधान केलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा वंचित आघाडीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील, असा दावा गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला. ते धुळ्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, गुलाबराव पाटलांनी 50 खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती नको; शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या विधानाने खळबळ

 शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”