आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरोधात बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत शिंदेंनी सरकार स्थापन केलं. यानंतर अनेकांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा कल वाढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे.
मुंबईतील 100 हून अधिक महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश सुर्वे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा : ग्रामपंचायत निकाल 2022! नाशिकमध्ये ना भाजप, ना शिंदे गट; राष्ट्रवादी-शिवसेनेनं मारली बाजी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या उपस्थितीत प्रभाग क्र.२५ च्या मा.भा.ज.पा वार्ड अध्यक्षा सौ. प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मागाठाणे विधानसभा प्रमुख सौ.मीना पानमंद, श्री.आनंद डोंगरे आणि पदाधिकारी उपस्थित होते. असं सुर्वे यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
यावेळी मागाठाणे विधानसभा प्रमुख सौ.मीना पानमंद, श्री.आनंद डोंगरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.@CMOMaharashtra @DrSEShinde pic.twitter.com/8GEuEzUIll
— Prakash Surve – प्रकाश सुर्वे (@miprakashsurve) September 18, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
…तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा; नारायण राणेंचं मोठं वक्तव्य
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला मैत्रीचा हात पुढे; ठाकरे देणार प्रतिसाद?”