आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
माथेरान : मे महिन्यात शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना दोन दिवसांपूर्वी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला दुसरा मोठा धक्का दिला आहे.
माथेरान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनी भापला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. माथेरानमध्ये दळवी हे बऱ्यापैकी ताकद राखून आहेत. अवघ्या तीन दिवसांत भाजपला हा दुसरा जबर धक्का बसला आहे.
हे ही वाचा : पुण्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; सुप्रिया सुळेंनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग
सुमारे तीन वर्षांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत राजेश दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने त्यांनी सहकारी नितीन शेळके यांच्यासह रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माथेरान तालुका अध्यक्ष भगवान चंचे, माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अजय सावंत हे उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना यंदा साजरी करणार भगवी दिवाळी; औरंगाबादमध्ये 50 हजार घरांवर फडकवणार भगवा”
चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात…
मनसेचा राजू शेट्टींना धक्का; स्वाभिमानीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश