Home महाराष्ट्र नितीन गडकरींनंतर आता रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना पुन्हा उधाण

नितीन गडकरींनंतर आता रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना पुन्हा उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सूरू आहेत. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानं मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच आता गडकरींनंतर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे.

हे ही वाचा :  शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांना सुनावलं ; म्हणाले…

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, या भेटीवेळी दानवे यांनी राज ठाकरे यांना रेल्वे इंजिनाची प्रतिकृती राज ठाकरेंना दिली.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांच्या सिलव्हर ओकवरील आंदोलनावर उदयनराजेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या…; नारायण राणेंची संजय राऊतांवर टीका

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची धडक; चप्पलफेकही केली