आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रायपूर : महाराष्ट्र आणि बिहारमधील सत्ता बदलानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्ता बदलाची स्थिती निर्माण झाली आहे.
झारखंडमधील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने त्यांच्या 40 आमदारांना विशेष विमानाने रायपूरला पोहोचवलं आहे. याबाबत काँग्रेसच्या सूत्रांनी माहिती दिली आहे.
हे ही वाचा : नारायण राणेंना बाळासाहेबांनी अक्षरश: हाकलून दिलं होतं; शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं सांगितला जुना प्रसंग
या आमदारांना नवा रायपूरच्या एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. या आमदारांची जबाबदारी कर्मकार मंडळाचे अध्यक्ष सन्नी अग्रवाल, राज्य खनिज विकास निगमचे अध्यक्ष गिरीश देवांगन आणि नागरिक आपूर्ती निगमचे अध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रिसॉर्टच्या आतमध्ये जाण्याची परवानगी कोणालाही देण्यात येत नाहीये. तीन लेयरच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये तिसऱ्या लेयरमध्ये ASP स्तराचे अधिकारी, दुसऱ्या स्तरावर CSP यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी; वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार शिवबंधन”
शिवतीर्थावर शिवसेनेचा म्हणजे आमचा दसरा मेळावा होणार- उद्धव ठकरे