Home महाराष्ट्र जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी…

जामीन मिळताच जितेंद्र आव्हाडांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आज जामीन मिळाला.

जामीन मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी जोरदार आरोप केले आहेत. माझ्या अटकेशी पोलिसांचा संबंध नाही., असं आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा : ठाकरेंचा शिंदेशाहीला पुन्हा दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्याची पुन्हा ठाकरेंकडे गृहवापसी

पोलिसांच्या डोळ्यात हतबलता दिसत होती. मला चौकशीसाठी पाच वाजता बोलावलं, मात्र अडीच वाजताच अटक केली. हे जाणून बूजून करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.  हर हर महादेव या चित्रपटाला राज ठाकरे यांचा आवाज दिला गेला आहे. तसेच राज ठाकरे हुशार आहेत, मी त्यांच्या पेक्षा छोटा आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी हे मी सांगणार नाही. पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृती करण म्हणजे अस्मितेची आणि मराठी माणसाची विकृती करणं आहे, असं आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘या’ निवडणूकीत महाविकास आघाडीचा सूपडा साफ; भाजप-शिंदे गटाचा दणदणीत विजय”

“ठाकरेंचा शिंदेंना दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”

पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा