Home महाराष्ट्र अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या

अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या

मुंबई : अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागला असून पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा असल्याचं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं.

सचिन वाझेवर झालेल्या कारवाईत 5 अधिकारी निलंबित झाले आहेत. परमबीर सिंग घरी गेले, अनिल देशमुखांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. आता सध्या अनिल परबांचा नंबर असून त्यानंतर पुढचा जितेंद्र आव्हाडांचा नंबर असेल असा दावा किरीट सोमय्यांनी यावेळी केला.

दरम्यान, भाजप उद्धव ठाकरे सरकारमधला भ्रष्टाचार पूर्णपणे बाहेर काढेल, असं सोमय्या म्हणाले. तसेच राज्यातील सरकारनं खुशाल 5 वर्षे पूर्ण करावी. पण मंत्री आणि नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव- गोपीचंद पडळकर

मराठा समाज तसाही अजित पवारांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही- चंद्रकांत पाटील

कोरोना काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत; अजित पवार भडकले

चंद्रकांत पाटलांसह भाजपावाले कोमात आहेत काय?; हसन मुश्रीफ यांचा सवाल