आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळी व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेतील 53 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवांनी याप्रकरणी नोटीस पाठवली असून यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचं कारण नव्हतं., असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंची लवकरच भेट घेणार; महापूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात पर्यावरण प्रेमींकडून ‘आरे वाचवा’ आंदोलन केलं जात आहे. आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
“एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”
शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती; दीपाली सय्यद यांचं ट्विट
शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी