Home महाराष्ट्र मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली. यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला असून आता फिरत आहेत, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. यावर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करायचं आहे. त्यासोबतच लोकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. तसेच आपण जर विरोधकांच्या टीकेवर लक्ष केंद्रीत केलं तर आपण काहीच करू शकणार नाही., असंंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण राणे

सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

“धक्कादायक! वरळीमध्ये इमारत कोसळली, चाैघांचा मृत्यू तर अनेक जखमी”