Home महाराष्ट्र परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे बरेचसे मूल्यमापन पूर्ण झाले असून अंतिम परीक्षांचे मूल्यमामापनातील महत्त्व 10 टक्क्यांहून जास्त असणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावला जाऊ शकतो, असंही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मी फक्त बैलाची शिंगं पकडली; हसन मुश्रीफांचा पलटवार

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते- उद्धव ठाकरे

महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली; ‘इतके’ लोकं अडकल्याची भीती

“केंद्र सरकारची ई-पासबाबत नवीन सूचना; पण महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नाही”