बाॅलिवूड अभिनेत्रींशी अफेअरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंनी सोडलं माैन, म्हणाले…

0
290

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पहायला मिळतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते पर्यटन व पर्यावरण मंत्री होते. तसेच याचसोबत बॉलिवूड क्षेत्राशीही त्यांचा जवळचा संबंध आहे.

बाॅलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींसोबत आदित्य यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच अशातच आदित्य यांचं नाव बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी जोडलं गेलं होतं. दिशा पटानी व आदित्य यांच्या अफेअरच्या चर्चाही सातत्याने रंगत होत्या. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

आदित्य ठाकरेंनी नुकतीच ‘कर्ली टेल्स’च्या संडे ब्रंच या कार्यक्रमाला हजेरी लावली. या मुलाखतीत आदित्य यांनी दिशा पटानाशी असलेल्या रिलेशनशिपबाबत वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्रींबरोबर तुमचं नाव जोडलं गेल्याच्या अफवा होत्या. त्या खऱ्या असत्या तर…असं तुम्हाला वाटतं का?” असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, नाही. त्या सगळ्या अफवा आहेत. बॉलिवूड अभिनेत्री माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

पुणे मराठा महासंघा तर्फे भव्य शिवजयंती उत्साहात साजरी

भावी मुख्यमंत्री होणार का?; NCP कार्यालयाबाहेरच्या पोस्टरवर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here