Home महाराष्ट्र संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; म्हणाले…

संजय राऊत यांच्या मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; म्हणाले…

मुंबई : करोनाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने भविष्यात येणारी आव्हानं लक्षात घेता वानखेडे स्टेडिअम क्वारंटाइनसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात घेतलं जावं अशी मागणी ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या मागणीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे.

आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, करोनाशी लढा देण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर केला पाहिजे. क्वारंटाइन सुविधेसाठी वानखेडे मैदान ताब्यात घेण्याचा निर्णय योग्य आहे. ब्रेबॉर्न स्टेडिअमदेखील ताब्यात का घेतलं जाऊ नये ? तिथेही योग्य सुविधा उपलब्ध आहेत, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं होतं. यावर आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला

महत्वाच्या घडामोडी-

एकनाथ खडसे यांना बाजूला सारण्याची हिम्मत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नाही- पृथ्वीराज चव्हाण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूवर मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

…त्यामुळे काळजी नसावी; शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय भारतात हलवणार; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक