आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात आज दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावरून आता विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यास सूरूवात केली आहे. यावरून आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांनी यासंदर्भात विचारणा केली असता आदित्य ठाकरेंनी आजच्या स्थितीवरही भांडण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी याबाबतीत भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांच्या भूमिकेशी मीही सहमत आहे. पण सध्याच्या स्थितीसाठीही राष्ट्रीय पक्षांनी भांडायला पाहिजे., अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी यावेळी दिली.
हे ही वाचा : “राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींच्या सभेआधी मनसैनिक लोकेशनवर”
आपण सगळे 50 वर्षांपूर्वी किंवा 100 वर्षांपूर्वी कोण योग्य आणि कोण अयोग्य होतं, यावर भांडायला लागलो, तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्ताच्या स्थितीसाठी कोण भांडणार?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आमदार रवी राणांची जीभ घसरली, म्हणाले…
भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ नेत्यासह अनेकांनी केला भाजपमध्ये प्रवेश
कोणत्याही चित्रपटात जर पाकिस्तानी कलाकार दिसल्यास…; मनसेचा बाॅलिवूडला धमकीवजा इशारा