Home महाराष्ट्र मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय.

“मी माझी राजकीय कारकीर्द 2000 मध्ये सुरु केली होती, जेव्हा मी रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. मी विद्यार्थी परिषद आणि रूपारेलच्या बीव्हीएस युनिटमध्ये सक्रिय होतो. माझी कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी या पदावर निवड झाली होती. कॉलेजमध्ये असताना एस.यू.एस.ने शिवाजी पार्क येथे “लता मंगेशकर” शो आयोजित केला होता. त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी रूपारेल बीव्हीएस युनिटमधूनही काम पाहत होतो. हा कार्यक्रम “भुज” भूकंप मदत निधीसाठी आयोजित करण्यात आला होता, असं आदित्य शिरोडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकार हँग झालंय, त्यामुळे…”; दहावीच्या निकालावरून अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“पंकजा मुंडेंची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे”

“देशमुखांची आज ईडीने 4 कोटीची संपत्ती जप्त केली, हळू हळू 100 कोटींची मालमत्ता जप्त होणार”

संजय राठोड आमचे दुश्मन नाही, शिवसेना तर बिलकुल नाही- चंद्रकांत पाटील