“अभिनेता अक्षय कुमारची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”

0
218

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आज त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर अक्षयची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे अक्षय कुमारला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

तुमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून मी रूग्णालयात दाखल झालो आहे, लवकरच घरी परत जाण्याची मी आशा करतो, असं अक्षयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अक्षय कुमारला मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्याची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”

आत्ताची कोरोनाची स्थिती भयानक, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

“राज्यात विकेंड लाॅकडाऊन जाहीर; पहा असं असेल लाॅकडाऊनचं स्वरूप”

“उद्धव ठाकरेंना तुमच्याकडेच ठेवा अन् रोज उठून सलाम ठोकत बसा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here