नागपूर : 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला केला होता. त्याचबरोबर सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं. तसेच संजय राऊत यांना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपारी दिली आहे आणि ती सुपारी वाजवण्याचं काम ते करत आहे, असा टोला फडणवीसांना राऊतांना यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
OBC राजकीय आरक्षणावरून भाजपा आक्रमक; उद्या राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन
संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू; नवी नियमावली जारी
करावं तसं भरावं, त्यामुळे ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने राजकारण करू नये- नारायण राणे
“गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, मुलीनं चांगलं काम केलं म्हणून प्रोत्साहन द्यायला हवं”