मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल जनतेशी संवाद साधत मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हात जोडून विनंती केली होती की, मराठा आरक्षण आता आपला अधिकार आहे. त्यामुळे काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली, तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर यावर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त.., असं ट्विट करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
आताच झालेल्या मुख्यमंत्री FB live नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया..
आदु… तुझ्या पप्पांनी केंद्रसरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त..
— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
आसाराम बापूंना ICU मध्ये केलं दाखल; काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
“मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही, हे विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे”
“माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन”
राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे- रामदास आठवले