एक नोटीस आली अन् पक्ष हादरला…; राम कदमांची टीका

0
398

मुंबई : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली. या नोटीशीवरून शिवसेना-भाजपात राजकारण रंगलं आहे. भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर आता राम कदम यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. सामनामध्ये हल्ली राम मंदिराबरोबरच बाबरी मशीदचाही उल्लेख होतो. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेस पक्षाने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? असा सवाल करत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला, नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

“एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण?”

“17 व्या वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण, आता भाजपमध्ये प्रवेश”

सत्ता विश्वासघाताने मिळवता येते, पण…; भाजपची शिवसेनेवर टीका

आपला तो ‘बाब्या’, दुसऱ्याचा तो ‘कारटा’; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here