“दादा मास्क काढा” भाषणादरम्यान अजित पवारांना चिठ्ठी; त्यावर अजित पवार म्हणतात…

0
173

पंढरपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. यावेळी भाषण करताना अजित पवारांना  मास्क काढा  असं लिहिलेली चिठ्ठी आली.त्यावर अजितदादांनी “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा” असं मिश्कील भाष्य केलं.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “मास्कमुळे आवाज येत नाही, दादा मास्क काढा” असं लिहिलेलं होतं.

कार्यकर्त्याने पाठवलेली ही चिठ्ठी अजित पवारांनी भरसभेत जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून” असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.

दरम्यान, पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे, हे फडणवीसांनी दाखवून द्यावं- जयंत पाटील

“मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही”

मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं- अतुल भातखळकर

कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला?- संभाजी भिडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here