मुंबई : जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणी भाजप नेते नारायन राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
मुंबईमध्ये 4689 मृत्यू झालेत. आणि महाराष्ट्रात 8178 एवढी मृत्यू संख्या आहे. बाधीतांची संख्या तर विचारूच नका. रोज रूग्ण वाढतायेत, मृत्यूमुखी पडतायेत याला जबाबदार कोण? हे सरकार जर मृत्यू थांबवण्यात अपयशी ठरत असेल तर हे सरकार काय कामाचं?, असा सवाल नारायण राणेंनी यावेळी केला. ते बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
रोज नवीन आदेश निघतात, त्याचं पालन होत नाही. जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही असं माझं ठाम मत आहे, असंही नारायण राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
बाळासाहेब थोरातांनी मोदी सरकारवर केले ‘हे’ गंभीर आरोप; म्हणाले…
“देवेंद्र फडणवीस सध्या अस्वस्थ आहेत, त्यांचं स्वप्नभंग झाल्यामुळेच ते अशी वक्तव्यं करत आहेत”