नवी दिल्ली : ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या वादानंतर पोलिस आक्रमक झाले असून पोलिसांनी लाठीचार सुरू केला. पोलिसांच्या या लाठीचारात एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेला शेतकरी हा उत्तराखंडचा आहे. मात्र अद्याप त्या शेतकऱ्याचं नाव समजू शकलेलं नाही. आयटीओ चौकामध्ये त्या तरूणाचा मृतदेह ठेवण्यात आला असून शेतकरी धरणे आंदोलनाला बसले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचारामुळे आणि अश्रूधुऱ्याच्या माऱ्यामुळे तरूण शेतकऱ्याचा मृत्यु झाला आहे. आम्ही शांतता पद्धतीने आंदोलन करत होतो मग आमच्यावर लाठीचार का करण्यात आला, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील”
“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देऊ”
धनंजय मुंडेंकडून अधिकारी फैलावर
“प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास”