राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ जिल्हा कार्याध्यक्षांचा राजीनामा

0
670

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबादेत दाखल झालेल्या या परिवार संवाद यात्रेदरम्यान चिकटगांवकर यांनी राजीनामा थेट जयंत पाटील यांच्याकडेच सुपूर्द केल्याने पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाटयावर आला आहे.

दरम्यान, आता प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील त्यांचा राजीनामा स्वीकारतात, की त्यांची समजूत काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिकटगांवकर यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण पत्रात नमूद केले नसले तरी पक्षांतर्गत गटबाजीमुळेच त्यांनी पद सोडल्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार; रूपाली चाकणकरांचा घणाघात

अजित दादांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकावं, नाहीतर…; संजय राऊतांचा इशारा

“मोदींना टक्कर देऊ शकेल असा कोण नेता असेल, तर त्या ममता बॅनर्जी आहेत”

संजय राऊत, पवार कुटूंबाची चाटूगिरी किती करणार, जिभेला आराम द्या; निलेश राणेंचा घणाघात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here