आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर हवेलीत झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर मोठ्या मताने विजयी झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हा विजय म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
हे ही वाचा : भाजपाला बालेकिल्ल्यातच दणका; काँग्रेसचा मोठा विजय
उद्धव ठाकरेंचा हातात हात घेतलेला फोटो पोस्ट करत महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचे पहिले पाऊल. उद्धव ठाकरेंचे हे पंतप्रधान बनण्याच्या वाटेतील मोठे पाऊल आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी #Chalodelhi हा हॅशटॅग वापरला आहे.
दरम्यान, लाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव करत दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकवला.
First step outside Maharashtra, giant leap towards Delhi via Dadra Nagar Haveli ! #ChaloDelhi pic.twitter.com/8sbqBgSbna
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”
…तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावं लागेल- संजय राऊत