आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : तीन दिवसांपूर्वी भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या उल्हासनगरातील टीम ओमी कलानीच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला होता. यानंतर हा प्रवेश खोटा असल्याचा दावा भाजपने केला.
पप्पू कलानी तुरुंगाबाहेर आल्यानंतर कलानी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तसच भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानीच्या 22 नगरसेवकांनी ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत मोठी खळबळ उडवून दिली.
हे ही वाचा : “शेतकऱ्यांना अल्प मदत; ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते करणार आंदोलन”
हे प्रवेश प्रत्यक्ष नगरसेवकांचे झालेले नसून नगरसेवकांच्या पती किंवा पत्नी यांचे आहेत. त्यामुळे हा प्रवेश खोटा असल्याचा आरोप करत भाजपच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल, तर राष्ट्रवादीने आपल्या पक्षाच्या अधिकृत लेटरहेडवर या नगरसेवकांची यादी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते प्रदीप रामचंदानी यांनी केली आहे.
दरम्यान, या सगळ्याबाबत टीम ओमी कलानीचे प्रमुख आणि पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांना विचारले असता, पक्षांतर बंदी कायद्यामुळे नगरसेवकांनी प्रत्यक्ष प्रवेश केलेला नाही. नगरसेवकांचे पती किंवा पत्नी यांनी प्रवेश केला. त्यामुळे नगरसेवकही आपसूकच राष्ट्रवादीत आले असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; नारायण राणेंनी प्रचारासाठी कसली कंबर
मनसेत प्रवेशाचा धडाका; चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश
हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच आव्हान