आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व राणे यांच्यात संघर्ष पेटला आहे. निश्चित केलेल्या जागेवरच हे दोन्ही प्रकल्प होणार, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. मात्र शिवसेनेकडून या दोन्ही प्रकल्पाच्या जागेला विरोध करण्यात आला आहे. आता यावरून खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणें यांच्यावर निशाणा साधला.
नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत सी वर्ल्ड आणि नाणार हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. तर, प्रकल्पांच्या जागेला कडाडून विरोध करत विनायक राऊत यांनीही नारायण राणेंवर टीका केली आहे.
हे ही वाचा : महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू
राणे यांना ‘सी वर्ल्ड’ प्रकल्पात जास्तच रस असल्याचे दिसते. हा प्रकल्प फक्त 300 एकर जागेवर होणार आहे, पण त्यासाठी 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेलं उभी करायची हा नारायण राणे यांचा धंदा आहे, असं विनायक राऊत म्हटंल.
मंत्री झाले असले तरी त्यांचे हे प्रकार थांबले नाहीत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत गावं उद्ध्वस्त करून ‘सी वर्ल्ड’ होऊ देणार नाही, हिंमत असेल तर रिफायनरीचा प्रस्ताव नारायण राणेंनी रेटून दाखवावा, असं आव्हान विनायक राऊत यांनी राणेंना दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांचं ट्विट; चर्चेला उधाण
शिवसेनेचा भाजपला मोठा दणका; भाजपात गेलेले ‘ते’ 10 नगरसेवक ठरले अपात्र
“अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही भास्कर जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली”