आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आर्यन खान प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरुद्ध एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला फोटो, त्यांचा जन्माचा दाखला, निकाहनामा असे सर्व ट्विट करत आरोप केले आहेत. यावरून आता भाजपाच्या एका नेत्याने नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
“कोणाला लग्नाचे दाखले, जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा. काहीही पुरावे नसतील तरी या, ‘नवाब मलिक झेरॉक्स सेंटर’वर काढून मिळतील.” असा टोला भाजपा आमदार राम सातपुते यांनी लगावला आहे.
हे ही वाचा : हे सरकार फक्त एकाचं विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे…; चित्रा वाघ यांची टीका
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा कथित दाखला ट्विटवरून शेअर केला होता. यामध्ये त्यांचे नाव ‘समीर दाऊद वानखेडे’ असल्याचे दिसत होते. समीर वानखेडेंनी मुस्लिम असल्याचे लपवून खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला. याच पार्श्वभूमीवरून राम सातपुते यांनी नवाब मलिकांना ट्विट करत टोला लगावला आहे.
कोणाला लग्नाचे दाखले ,जातीचे दाखले, जन्माचे दाखले काढायचे असतील तर संपर्क करा.
काहीही पुरावे नसतील तरी काढून मिळतील ..
– नवाब मलिक झेरॉक्स सेंटर @nawabmalikncp @mohitbharatiya_ @Dev_Fadnavis
— Ram Satpute (@RamVSatpute) October 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; राज्य सरकारकडून ‘या’ महत्वाच्या मागण्या मान्य
शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश