मुंबई : चित्रपट उद्योगात सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात आणि भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे, अस खळबळजनक विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
चित्रपटसृष्टीत अंमली पदार्थांचा सर्रास वापर होत असून त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. तसेच अंमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना मात्र व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात यावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये किंवा तुरुंगात टाकू नये, असं आठवले म्हणाले.
हे ही वाचा : “यंदाच्या दिवाळीला अमृता फडणवीस चाहत्यांना देणार एक सुरेल दिवाळी गिप्ट”
दरम्यान, ज्यांच्याकडे अंमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते. बदलण्याची गरज आहे आणि जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्ज वापरतात त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे, त्यामुळे ते सुधारतील असा आमच्या मंत्रालयाचा विश्वास आहे, असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
इकडे येऊन ते गाजर वाटप करून गेले असतील; आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”