Home पुणे काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी :  कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी कामगार नेते डॉ. कैलास कदम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लगेच काँग्रेमध्ये जोरदार इन्कमिंगला सुरुवात झाली आहे. भाजप, शेकापसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सचिन साठे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी 7 ऑक्टोबर 2021 ला कदम यांची नियुक्ती झाली. त्यानंतर या महिन्यातच भाजपच्या झोपडपट्टी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ जगताप, शेकापच्या महिला शहर अध्यक्षा छाया देसले, रॅायल फांऊडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी नांगरे, ख्रिश्चन एकता मंच संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पठारे यांनी आपल्या समर्थकांसहित काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला.

हे ही वाचा : “शिवसेनेशी केलेली बंडखोरी भोवणार, माथेरानमधील ‘त्या’ नगरसेवकांचा आज लागणार निकाल”

दरम्यान, कॉंग्रेसच्या विचारधारेवर सर्वसामान्यांचा विश्वास आहे. यामुळेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला असं विश्वनाथ जगताप यांनी सांगितले. तर देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि इतरही अनेक सामाजिक समस्यांना कारण भाजपचे धोरण आहे, याला आता जनता कंटाळली असल्याने सद्यस्थितीत देशाला काँग्रेसची गरज आहे, अशा स्थितीत काँग्रेसच्या समतावादी विचारांमुळे या पक्षात आल्याचं छाया देसले म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी – 

ज्या शिवसेनेनं केलाय घात, त्यांचा…; भाजप उमेद्वाराच्या प्रचारात रामदास आठवलेंची कवितेतून टोलेबाजी

महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप

मुजीब रेहमान, राशिद खानच्या फिरकीसमोर स्काॅटलंडचं लोटांगण; अफगाणिस्तानचा 130 धावांनी विजय