नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या विजयासाठी भाजप आणि आरपीआय मैदानात उतरले आहेत. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी साबणे यांच्या प्रचारार्थ कवितेतून तुफान भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवसेना सुभाष साबणेला गद्दार म्हणते मग तुम्ही गद्दारी केली नाही का?, असा सवाल आठवले यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच ‘ज्या शिवसेनेने केलाय घात, त्यांचा तोडून टाकावा लागेल हात’ असं कवितेतून आठवले म्हणताच सगळ्यांना हसू आवरलं नाही.
हे ही वाचा : महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप
मी इथे आलो नाही मिरवण्यासाठी, मी आलो आहे जिंकण्यासाठी, ज्यांनी जिंकली लोकांची मने, त्यांचे नाव सुभाष साबणे, असं म्हणत आठवलेंनी साबणेंच्या प्रचाराची सुरूवात केली. आठवलेंनी त्यांच्या तुफान फटकेबाजीने ही सभा जिंकली. तर मी आणि फडणवीस एकत्र आलो की सीट जिंकून येते, असा विश्वास आठवलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
मुजीब रेहमान, राशिद खानच्या फिरकीसमोर स्काॅटलंडचं लोटांगण; अफगाणिस्तानचा 130 धावांनी विजय
हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा; नितेश राणेंचा इशारा
नानाभाऊ पटोलेच आता निवडून येणार; औरंगाबादच्या ‘या’ लोकगायिकानं गाण्यातून व्यक्त केल्या भावना