आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सहकारी साखर कारखानदारीच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सुरू असलेल्या वर्षाकरिता गुणवत्ता पारितोषिके जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्र सरकारने 21 पारितोषिके पटकावली आहेत. दिल्लीत 16 नोव्हेंबरला हा पारितोषक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सहकार खात्याचे मंत्री अमित शहा एकाच मंचावर येणार आहेत.
हे ही वाचा : नाशिकमध्ये शिवसेना देणार भाजपला धक्का! संजय राऊतांच्या मेळाव्यात भाजपचे नगरसेवक
कोरोनाच्या संकटात मागील वर्षी पारितोषिक वितरण सोहळा होऊ शकला नाही. यामुळे दोन्ही वर्षांची पारितोषिके एकाच वेळी वितरित करण्यात येईल. महाराष्ट्रातील 46 कारखान्यांनी यात सहभाग नोंदविला होता. तर देशातील 284 पैकी 108 सहकारी साखर कारखान्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
दरम्यान, देशातील सर्वोत्कृष्ट ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ भाजप आमदार प्रशांत परिचारक अध्यक्ष असलेल्या सोलापूरच्या श्री पांडुरंग कारखान्याने पटकावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पारितोषकांची यादी जाहीर केली आहे. सर्व कारखान्यांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे कुटुंबातला भावनिक क्षण; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फोन; तब्येतीची केली विचारपूस
‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील यांचा इशारा
…म्हणून मी नितीन गडकरींना भेटले; पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण