आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्याचा अंतिम टप्पा बाकी असताना दौरा अर्धवट सोडत ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अजित पवार तात्काळ मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”
अजित पवार आज दिवसभर पुण्यात होते. त्यांनी सकाळी दहा वाजता कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर पुण्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. त्यांच्या आजच्या दौऱ्यामधला शेवटचा कार्यक्रम हा अशोकनगरमधील जलतरण तलावाच्या उद्घाटनाचा होता. मात्र, त्यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक फोन आला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना व्हावं लागलं.
दरम्यान, अजित पवार यांनी अर्धवट दौरा सोडून मुंबईच्या दिशेला रवाना होण्यामागचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र अजित पवार यांनी ज्यापद्धतीने दौरा अर्धवट सोडला त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेशी लढण्यासाठी भाजपा राज ठाकरेंचा वापर करत आहे; शिवसनेचा आरोप
निवडणूक जिंकायची कशी?; जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ कानमंत्र
भाजपकडून शिवसेनेला मोठा धक्का; पिंपरीतील पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर?