आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्यांवर नाराज होऊन काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे.
राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्याने सावंत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : ‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून राऊतांचा टोला
सचिन सावंत हे गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून त्यांनी तडकाफडकी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. तसेच सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचंही समोर येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं चाहीए?, असं विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरून राऊतांचा टोला
भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे; शिवसेनेच्या ‘या’ नेताचा आक्रमक पवित्रा
भाजपनं मनसेच्या नादी लागू नये, पुण्याचं महापाैरपद आम्हाला मिळालं पाहिजे- रामदास आठवले