Home महत्वाच्या बातम्या हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजप ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार

हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजप ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपाचे 15 ते 20 नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. याला भाजपा नेते भालचंद्र शिरसाट यांनी पलटवार केला आहे.

भाजपाचे नगरसेवक संपर्कात असल्याचे फुसके बार शिवसेनेने सोडू नये. कारण भाजपाचा एकही नगरसेवक फुटणार नाही. शिवसेनेचा हा दावा केवळ फुसका बार आहे. असे फुसके बार सोडण्याची शिवसेनेची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष बाहेरच्या लोकांच्या बळावर चालत आहे आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे, असं भालचंद्र शिरसाट म्हणाले आहेत

हे ही वाचा : “सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो, तर कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं काय झालं, ते पहावं लागेल”

जेव्हा जेव्हा शिवसेनेला उमेदवार सापडत नव्हते, तेव्हा भाजपाने लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी त्यांना उमेदवार दिलेले आहे. याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार आता सापडत नाही आहे. त्यामुळे आता ते भाजपा नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत, असा टोलाही भालचंद्र शिरसाट यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्यांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

“काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजप कोणत्या बिळात लपलात?”