मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आज होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाषण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
आज संध्याकाळी जेंव्हा शिवसेना पक्षप्रमुख भाषणाला उभे राहणार, तेंव्हा तुम्हाला कळेल की, विजयादशमी निमित्त शमीच्या झाडावरची शस्त्रे काढली जातात, ती कुणासाठी आहेत आणि कशासाठी काढली जातात. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख काय भूमिका मांडतात याकडे देशभराचे लक्ष आहे., असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनाचा दसरा मेळावा आज सांयकाळी षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेची दिशा दाखवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेळाव्यात आज भाष्य करणार आहेत. यातून राज्याला, देशाला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल. शस्त्र कधी कुणासाठी काढायची असतात हे आज उद्धव ठाकरेंच्या भाषणातून कळेल, असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है, म्हणू नये; गुलाबराव पाटलांचा मनसेवर पलटवार
2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल- संजय राऊत
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक