आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
यवतमाळ : राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यातच मनसेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत जोरदार इनकमिंग सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रात, मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. तसेच मनसेने वणी, मारेगाव तालुक्यात पक्षप्रवेशाचे मेळावे घेतले आहे. यात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती आहे.
दरम्यान, आणखी अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मनसेत प्रवेश करण्यास इच्छूक आहेत, अशी माहिती राजू उंबरकर यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“नैतिकता शिल्लक असेल तर, महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा”
महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज ठाकरेंच्या मनसेचाही विरोध
भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश
शेतकऱ्यांना चिरडलं, प्रियांका गांधींना रोखलं, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा- अशोक चव्हाण