Home महाराष्ट्र “नैतिकता शिल्लक असेल तर, महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा”

“नैतिकता शिल्लक असेल तर, महाराष्ट्र बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या बंदला महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी याला विरोध केला.यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते हे विविध ठिकाणी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा हा ढोंगीपणा आहे. राज्य सरकारनं आधी महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. राज्य सरकारमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर हा बंद संपण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं.

लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रात बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात. हे सरकार आल्यापासून 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या महाराष्ट्रात केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजार आणि 50 हजाराच्या केलेल्या घोषणा हवेत विरल्या, कर्जमाफीच्या घोषणा हवेत विरल्या, मदतीच्या घोषणा हवेत विरल्या, वेगवेगळी संकटं आली, त्यावेळी केलेल्या मदतीच्या घोषणा हवेत विरल्या. त्यांच्या घटकपक्षातील लोकही म्हणतात, पूर्वीचं भाजप सरकार मदत करत होतं, पण ज्या सरकारला आम्ही मदत करतोय, ते मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे., असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला राज ठाकरेंच्या मनसेचाही विरोध

भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश

शेतकऱ्यांना चिरडलं, प्रियांका गांधींना रोखलं, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा- अशोक चव्हाण

भाजपने माझी किंमत 100 कोटी ठरवली याचा मला आनंद- नवाब मलिक