आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडून टाकण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाविकास आघाडी विरोधाला विरोध करण्याच्या राजकारणात इतके मश्गूल आहे की त्यांना भान राहिलेले नाही की ते राज्यात सरकार चालवीत आहेत. राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकते? सरकारने बंद पुकारने ही महाविकास आघाडीची चुकीची भूमिका आहे. त्याचा त्यांनी पुनर्विचार करावा, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
लखीमपूर खेरीमधील हिंसाचाराचा आठवले यांनी तीव्र निषेध केला आहे. लखीमपूर खेरीतील प्रकार निषेधार्ह, दुःखद आणि मनाला चटका लावणारा आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसआयटीमार्फत चौकशी सुरू केली असून या प्रकरणी कोणीही दोषी असो त्यावर कठोर कारवाई निश्चित होईल. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांचे नेते नवीन कृषी कायद्यांबबत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.
केंद्र सरकार नवीन कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हवे ते बदल करण्यास तयार आहे. मात्र कायदेच रद्द करा, अशी आडमुठी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायद्यांबाबत सूचनांचे स्वागत करून कायद्यात सुधारणा करण्यास तयार आहे. त्यामुळे लोकशाहीत सर्वच प्रश्न आंदोलन करून सोडवताना काही प्रश्न चर्चा करून सोडविले पाहिजेत. लोकशाहीत आंदोलन करणे योग्य; मात्र शेतकरी नेते ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहेत तो आंदोलनाचा अतिरेक आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
देगलूर पोट निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी
पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी
“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”