Home महाराष्ट्र राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

राणें कुटूंबियांकडून शिवसेनेला मोठा धक्का; सिंधुदुर्गमध्ये 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. कोकणच्या विकासावरून दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलं. अशातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी बोलताना निलेश राणेेंनी म्हटलं की, कोकणात शिवसेनेत मोठी खदखद आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. शिवसेनेला अजून मोठे झटके देणार आहोत.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदाराचं डिपॉझिट जप्त करणार असल्याचा दावाही निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

देगलूर पोट निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मनसेच्या नेत्यांची भाजपसोबत युतीची मागणी

“प्रियांका गांधींमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसते”

जळगावमध्ये भाजपचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेमध्ये गेलेल्या बंडखोर नगरसेवकांची घरवापसी