आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप मेहनत करतात. मात्र, काही भाजपा नेते जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनता एक सक्षम नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहतात. पण भाजपा नेत्यांना पोटदुखी होत आहे. दादांच्या नातलगांवरील कारवाईमागील पडद्यामागचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.
अजित पवार हे मंत्रालयात सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडवितात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कामाच्या जोरावर त्यांनी राज्यातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे. काम होणार असेल तर ते झटकन करतात आणि होणार नसेल तर तोंडावर होणार नाही असे सांगतात. आजच्या तरुणांमध्ये दादांची मोठी ‘क्रेझ’ आहे. महाराष्ट्रातील जनता एक सक्षम नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहतात. कदाचित त्यामुळेच भाजपाचा पोटदुखी होत आहे, असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“नवाब मलिक हे कचरा किंग आहेत, त्यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल करणार”
“महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”
राज ठाकरेंची पुण्यात मोठी रणनीती; पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती
नारायण राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं; म्हणाले…