Home महाराष्ट्र “महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”

“महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचा राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागे करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, याची सुरुवात महाराष्ट्रामधून व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होणार आहेत. स्वत: शरद पवार यांनीही हा बंद शांततेत पार पडावा, असं आवाहन केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांच्याशीदेखील माझी या विषयावर चर्चा झाली. साधारण तिथं असंही ठरलं की महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनीदेखील अशा प्रकारे बंदची हाक द्यावी. जिथे जिथे आपली सरकारे आहेत, जिथे संघटन मजबूत आहे, त्या सर्वच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा बंद पुकारला जावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला रस्त्यावर जरी उतरता आलं नाही, तरी जिथून आहे तिथून पाठिंबा द्यावा. त्याशिवाय या निर्घृण कृतीला आळा बसणार नाही, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

अन्नदाता शेतकरी एकाकी नाही. हे दाखवण्याची ही वेळ आहे. म्हणून मी एवढंच सांगेन की, काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेनादेखील या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंची पुण्यात मोठी रणनीती; पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती

नारायण राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं; म्हणाले…

“खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं”

उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…