Home महाराष्ट्र वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्‍यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची...

वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्‍यांच्या मदतीवेळी ‘कासव’; फडणवीसांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

वसुली आली की या सरकारचा `ससा` होतो आणि शेतकर्‍यांना मदत द्यायची वेळ आली की, `कासव`, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सराकारला टोला लगावला आहे.

मार्च, एप्रिल, मे 2021 मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 रोजी, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहचणार? ‘वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी का असे धडपडते? विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

‘तुम्ही चोऱ्या केल्या नसत्या तर धाडीही पडल्या नसत्या’; रावसाहेब दानवेंचा टोला

संघर्ष करणे पवार कुटुंबियांची खासियत, महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळे कडाडल्या

मुख्यमंत्र्यांना पाहुणचार करू, पण… ; नारायण राणेंचा खोचक टोला