आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विदर्भ तसेच मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. हे सरकार झोपलेले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे. आम्ही झोपलेल्या या सरकारला जागे करणार आहे. जोपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची भरपाई मिळून देत नाही, तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत ही मिळवूनच देणार आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“नाशिकमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश”
किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या”
आम्ही बांधावर होतो, तेव्हा पंकजा मुंडे अमेरिकेत होत्या; धनंजय मुंडेंचा टोला