नवी दिल्ली : जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक, पंतप्रधानांना देखील लागू आहे, काही लोकांच्या बेजबाबदारपणामुळे पूर्ण देश अडचणीत येईल , असं नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचं ट्विटवरुन सांगितलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
एकमेकांपासून दूर राहणं फक्त रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी आवश्यक- नरेंद्र मोदी
“लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे”
आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका; उपमुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 97 वर ; सांगलीत 4 तर मुंबईत 3 नवीन रुग्ण