अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर चाकूहल्ला; मुंबई पोलिसांनी आरोपीला केलं अटक

0
174

मुंबई : अभिनेत्री माल्वी मल्होत्रावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला वसईतील एका रुग्णालयातून अटक केली असून आरोपी योगेश कुमारवर मुंबई पोलिसांनी कलम 307, 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

माल्वी मल्होत्रा मुंबईच्या वर्सोवा भागातील CCD रेस्टॉरन्टमधून परतत असताना आरोपी ऑडी कारने तेथे आला. त्याने माल्वीला आपल्यासोबत येण्यास सांगितले. तिने नकार दिल्यानंतर आरोपी योगेशने तिच्यावर चाकूने तीन वेळा हल्ला केला.

दरम्यान, आरोपीने माल्वीच्या चेहऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र माल्वीने हे वार आपल्या हातावर घेतल्याने चेहऱ्याला दुखापत झाली नाही, मात्र तिच्या हातांना गंभीर जखमा झाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कशाला भेटायचं, शरद पवारच सरकार चालवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा सरकारला टोला

“गुजरातचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन”

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही; राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

जेवलीस का? मॅचदरम्यान विराट कोहलीचा अनुष्काला प्रश्न; सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here