Home देश …तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

…तर तुमची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही; नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रतील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याच पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही राहीलं नाही आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे आरामात मातोश्रीवर बसलेत, असं सांगतानाच तुम्ही जोपर्यंत बांधावर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही सजमणार नाही, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

राज्याला तुमची गरज आहे, असं मातोश्रीबाहेर पडून शेतीच्या नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन करत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही येणारी तुमची दिवाळी सुखात करू देणार नाही, असा इशाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खासदार राणा यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 30 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही नवनीत राणा यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

गोव्यात काँग्रेसला धक्का; 4 पैकी 2 आमदार भाजपच्या वाटेवर

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू