…पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?; न्यायालयाच्या निकालानंतर आशिष शेलारांचा सवाल

0
143

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा  साधला आहे.

मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. याप्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.

पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!” “सिंघम” चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही, असा आरोप शेलारांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

माझ्यासाठी प्रार्थना करा- संजय दत्त

शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here