राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गाडीवर दगडफे

0
471

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा युवक राष्ट्रवादीचे  अध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली आहे. आदित्य गोरे  ‘गाव संपर्क अभियाना’च्या प्रवासात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पारडी फाटा येथे रात्री ही दगडफेक करण्यात आली.

राजकीय वादातून की अंतर्गत गटबाजीतून ही घटना घडली, याचा शोध घेणं सुरू आहे. हा वाटमारीचाही प्रकार असू शकतो, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

आदित्य गोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा जनसंपर्कावर भर असतो. राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांच्या फळीतील महत्वाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे.

दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

आता उद्धवचा काळ संपला, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार- नारायण राणे

पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुस्लिम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात…; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here